मित्रांनो, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भारतातील प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड म्हणून ओळखला जाणारा एक 12 अंकी ओळख क्रमांक नियुक्त करते. आधार हा ओळखीचा पुरावा आहे ज्याचा उपयोग विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केल्या जातो. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला PVC Aadhar Card Online कसे Order करायचे या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.
PVC आधार कार्ड काय आहे
PVC Sheet वापरुन बनवलेले आधार कार्ड हे पोर्टबल आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. ही आधार कार्ड ची नवीन आवृत्ती आहे जी Polyvinyl Chloride च्या शीट्स वापरुन UIDAI द्वारे वितरित केल्या जाते, PVC Aadhar Card चा आकार हा ATM कार्ड सारखा असतो आणि ते Waterproof देखील आहे एखाद्या वेळेस चुकून जर पाण्यात पडले तर पाण्याचा या PVC Aadhar Card वर कोणताच परिणाम होत नाही.
आधार कार्ड चे प्रकार
Aadhar Letter
आपण ज्या वेळेस आधार कार्ड काढण्यासाठी आधार केंद्रा वर जातो तेव्हा तिथून आपल्याला एक कागद मिळतो त्यालाच आधार लेटर असे म्हणतात. Aadhar Letter चा वापर करून तुम्ही तुमचे आधार कार्ड Generate झाले की नाही हे तपासू शकता. तुमचे आधार कार्ड पोस्टाने घरी आले नसेल तर तुम्ही Aadhar Letter चा वापर सरकारी कामांमध्ये देखील करू शकता.
हे ही वाचा – रेशन कार्ड ला आधार कार्ड कसे लिंक करावे?
eAadhar Card
इ-आधार कार्ड हे आधार कार्ड ची ऑनलाइन प्रत असते. UIDAI च्या वेबसाइट वर जाऊन तुम्ही तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांकावर मिळालेला OTP वापरुन Online E-Aadhar Card ची प्रत काढू शकता. ही प्रत सर्व सरकारी कामांमध्ये Valid असते.
PVC Aadhar Card
Polyvinyl Chloride Sheets चा वापर करून तयार केल्या गेलेले PVC Aadhar Card हा आधार कार्ड चा नवीन प्रकार आहे. तुम्ही तुमचे पीव्हीसी आधार कार्ड घरी बसून UIDAI च्या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन ऑर्डर करू शकता त्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागते आणि 15 दिवसांच्या आत PVC Aadhar Card पोस्टाने तुमच्या पत्त्यावर पाठवले जाते.
PVC Aadhar Card चे फायदे
- डेबिट कार्ड प्रमाणेच आकार असल्याने ते कॅरी करणे अगदी सोपे आहे.
- या कार्ड ची संपूर्ण बनावट ही PVC ची बनलेली आहे, PVC शीट्स मजबूत असतात आणि Waterproof देखील असतात.
- PVC Aadhar Card वर Hologram Sticker दिलेला असतो त्याचा वापर करून आधार कार्ड ची पडताळणी केल्या जाते.
PVC Aadhar Card Online कसे Order करावे
- सर्वात आधी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- मुखपृष्ठावर तुम्हाला My Aadhar या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- पुढील पृष्ठावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि मोबाइल नंबर वर मिळालेला OTP टाकावा लागेल.
- नंतर तुमच्या समोर तुमची आधार कार्ड ची संपूर्ण माहिती मिळेल.
- आता तुम्हाला ORDER PVC AADHAR CARD या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला तुमचा पत्ता बरोबर आहे की नाही हे तपासून Next पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- पुढील पृष्ठावर तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड साठी लागणारा 50 रुपये चार्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागेल.
- हे सर्व झाल्यावर सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.
मित्रांनो, माहिती आवडली असे तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Telegram आणि Whatsapp वर नक्की फॉलो करा.