Court Marriage in Marathi: भव्यदिव्य लग्न करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण प्रत्येकासाठी आपलं लग्न भव्यदिव्य करणं शक्य नसतं. अशा अनेक परिस्थिती असतात ज्यात तुम्हाला तुमचा जीवनसाथी स्वतः निवडायचा असतो, पण कुटुंबाच्या नापसंतीमुळे लग्न होत नाही. बहुतेकदा असे होते जेव्हा मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या जातीचे असतात त्यावेळी घरच्यांचा अश्या लग्नाला विरोध असतो. किंवा इतरही काही कारणे असू शकतात, अशा परिस्थितीत तुमच्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे Court Marriage.
जर तुम्ही मेजर असाल आणि तुम्हाला ज्या व्यक्तीशी लग्न करायचे आहे ती व्यक्ती देखील मेजर असेल (मेजर म्हणजे लग्नाचे जे वय कायद्याने ठरवून दिले आहे कमीत कमी तेवढे वय) तर कायदेशीररित्या तुम्हाला दिलेल्या सन्माननीय अधिकाराचा फायदा घेऊन तुम्ही Court Marriage करू शकता. त्यानंतर तुम्हाला विवाह प्रमाणपत्र दिले जाते. आज या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Court Marriage in Marathi बद्दल सर्व महत्वाची माहिती सांगणार आहोत जसे की, कोर्ट मॅरेज काय आहे?, कोर्ट मॅरेज कसे करायचे?, कोर्ट मॅरेज करण्यासाठी नियम आणि अटी कोणत्या आहेत, कागदपत्रे कोणती लागतात इत्यादि. Court marriage information in marathi बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचावी.
Court Marriage काय आहे?
Court Marriage हा एक प्रकारचा विवाह आहे जो अधिकृत कागदपत्रांनुसार मुलगा आणि मुलगी दोघांच्या संमतीने रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन कायदेशीर आरज देऊन केला जातो. कोर्ट मॅरेज बहुतेकडा तेव्हाच केले जाते जेव्हा मुलगा आणि मुलगी दोघेही वेगवेगळ्या वर्गातील असतात, त्यात कुटुंबाची संमती नसते. पण आजकाल लग्नात होणारा अवाजवी खर्च टाळण्यासाठी लोक कोर्ट मॅरेज कडे वळत आहेत. कोर्ट मॅरेजची पद्धत संपूर्ण भारतात सारखीच आहे. कोर्ट मॅरेजसाठी कायदा तयार करण्यात आला आहे. ज्याला आपण विशेष विवाह कायदा 1954 म्हणतो. या कायद्यानुसार, भारतीय नागरिक त्यांच्या पसंतीच्या मुला-मुलीशी लग्न करू शकतात, ज्यासाठी काही विहित अटी पूर्ण कराव्या लागतील.
हा कायदा परदेशी देशांसाठी देखील आहे, जर तुम्हाला परदेशी मुलगी किंवा मुलाशी लग्न करायचे असेल तर तुमचा धर्म वेगळा असला तरीही तुम्ही विशेष विवाह कायदा 1954 नुसार विवाह करू शकता. या कायद्यानुसार कोणत्याही धर्माचे आणि जातीचे नागरिक एकमेकांसोबत लग्न करू शकतात.आणि अश्या लग्नाला कायदेशीर आधार असतो.
कोर्ट मॅरेज करण्यासाठी नियम आणि अटी
जर कोणत्याही तरुण-तरुणीला कोर्ट मॅरेज (Court Marriage in Marathi) करायचे असेल तर त्यांच्यासाठी काही कायदेशीर नियम ठरवून दिले आहेत, ज्यानुसार मुलगा आणि मुलगी रजिस्ट्रारसमोर कोर्ट मॅरेज करू शकतात. कोर्ट मॅरेजसाठी महत्वाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत:
- मुलगा किंवा मुलगी दोघांचेही आधी लग्न झालेले नसावे.
- कोर्ट मॅरेजसाठी मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. आणि मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे.
- जर मुलगा किंवा मुलगी आधीच विवाहित असेल तर त्या मुलाने किंवा मुलीने घटस्फोट घेतलेला असावा.
- मुलगा किंवा मुलगी यांचे नाते भाऊ-बहिणी सारखे नसावे.
- कोर्ट मॅरेज करताना मुलगा आणि मुलीची मानसिक स्थिती योग्य असायला हवी.
Benefits of Court Marriage
- कोर्ट मॅरेज करून कोणताही मुलगा किंवा मुलगी आपल्या आवडीचा जीवनसाथी मिळवू शकतो.
- आंतरजातीय विवाहात, कोर्ट मॅरेजसाठी जोडप्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून सरकारकडून 2 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
- कोर्ट मॅरेज केल्यास लग्नसमारंभातील होणारा खर्च टाळता येतो. Court Marriage (in marathi) साठी जास्त खर्च येत नाही.
- तुम्हाला विवाह प्रमाणपत्र मिळते जे कायदेशीर दस्तऐवज म्हणून काम करते.
- तुमच्या संयुक्त मालमत्तेसाठी, संयुक्त बँक खाते उघडताना पासपोर्टसाठी अर्ज करताना, व्हिसासाठी अर्ज करताना, लग्नानंतर परदेशात स्थायिक होण्यासाठी, पतीच्या मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी, मृत्यूनंतर जीवन विमा पॉलिसीसाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- कोर्ट मॅरेज केल्यानंतर तुमच्या जीवाला धोका आहे असे वाटत असेल तर तुम्ही पोलिस संरक्षण देखील घेऊ शकता.
हे नक्की वाचा – आंतरजातीय विवाह योजना
कोर्ट मॅरेजसाठी फी आणि आवश्यक कागदपत्रे
कोर्ट मॅरेजसाठी किमान 1000 रुपये शुल्क आकारले जाते. परंतु कोर्ट मॅरेजसाठी तुम्हाला कागदपत्रे आणि वकिलांच्या फीसह 10,000 ते 20,000 रुपये खर्च येवू शकतो. याशिवाय कोर्टात लग्न करण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांचीही आवश्यकता असेल. कोर्ट मॅरेजसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Court Marriage Documents) खाली दिलेली आहेत:
- अर्ज (ज्यामध्ये सर्व माहिती भरलेली असावी)
- मुलगा आणि मुलगी दोघांचे पॅन कार्ड आणि ओळखपत्र
- मुलगा आणि मुलगी यांचे रहिवासी प्रमाणपत्र
- लग्न झालेल्या मुला-मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- 10 वी गुणपत्रिका
- प्रतिज्ञापत्र (मुलगा किंवा मुलगी दोघेही बेकायदेशीररीत्या संबंधात नाहीत याची पुष्टी करण्यासाठी)
- घटस्फोट प्रकरणात घटस्फोट प्रमाणपत्र
- मुलगी विधवा असल्यास पहिल्या जोडीदाराचा मृत्यू प्रमाणपत्र
- लग्नाच्या वेळी दोन साक्षीदारांचा फोटो
कोर्ट मॅरेज कसे करायचे?
कोर्ट मॅरेज (Court Marriage in Marathi) कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्ति सोबत करत येते, विशेष विवाह कायदा 1954 नावाचा भारतीय संविधांनाचा कायदा आहे. हा कायदा विशेष विवाह कायदा म्हणूनही ओळखला जातो, जो भारतातील नागरिकांना आणि परदेशात राहणार्या भारतीय नागरिकांना, धर्माचा विचार न करता विवाह करण्याचा अधिकार प्रदान करतो. कोर्ट मॅरेज कसे करावे यासंबंधीची प्रक्रिया खाली दिली आहे:
- सर्व प्रथम ज्या मुला-मुलीला लग्न करायचे आहे त्यांनी कोर्ट मॅरेजसाठी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये लेखी नोटीस द्यावी. म्हणजेच लग्न करण्याचा तुमचा इरादा तुम्हाला लिखित स्वरूपात द्यावा लागेल.
- मुला-मुलींना ज्या जिल्ह्यात लग्न करायचे आहे, ते त्या जिल्ह्यात 1 महिन्याहून अधिक काळ वास्तव्यास असावेत.
- तुमची विवाह सूचना विवाह निबंधक कार्यालयाची नोटिस बोर्ड वर लावली जाईल.
- लग्नाबाबत कोणाचा आक्षेप असेल, तर तो ३० दिवसांच्या आत रजिस्ट्रारसमोर आपला आक्षेप नोंदवू शकतो.
- आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीचा आक्षेप जर रजिस्ट्रारने मान्य केला तर संपूर्ण विवाह प्रक्रिया संपुष्टात येऊ शकते.
- ३० दिवसांच्या आत लग्नासाठी एखाद्या व्यक्तीने आक्षेप घेतला नाही तर नंतर लग्नाची प्रक्रिया सुरू केली जाते.
- मुलगा-मुलगी कुणाच्या दबावाखाली कोर्ट मॅरेज करत नाहीत, त्यासाठी कोर्ट मॅरेज करण्यापूर्वी मुलगा-मुलगी आणि साक्षीदारांनी निबंधकांसमोर घोषणापत्रावर सह्या कराव्या लागतात. ज्यावर लिहिले असते की, “तो कोणत्याही दबावाशिवाय स्वत:च्या इच्छेने हे लग्न करत आहे“.
- त्यानंतर घोषणापत्रावर अधिकाऱ्याची स्वाक्षरी असते.
- न्यायालयीन विवाह विवाह अधिकाऱ्याच्या कार्यालयात किंवा जवळ वाजवी अंतराच्या ठिकाणी केले जातात. ज्यासाठी तुम्हाला ठराविक फी भरावी लागेल.
- कोर्ट मॅरेज पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रार सर्व तपशीलांची नोंदणी करून विवाह प्रमाणपत्र जारी करतात. जो कोर्ट मॅरेजचा निर्णायक पुरावा असतो.
नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न (Faqs)
कोर्ट मॅरेज म्हणजे काय?
– कोर्ट मॅरेज ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी दोघेही अधिकृत कागदपत्रांसह आणि काही साक्षीदारांसमोर रजिस्ट्रार ऑफिसमध्ये हजर राहून लग्न करतात.
भारतात लग्नाची नोंदणी कोणत्या कायद्यानुसार केली जाते?
– भारतात विवाह हिंदू विवाह कायदा 1955 किंवा विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत नोंदणीकृत केला जाऊ शकतो.
कोर्ट मॅरेजसाठी मुला-मुलीचे वय किती असावे?
– कोर्ट मॅरेजसाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 पेक्षा जास्त असावे.
कोर्ट मॅरेजसाठी किती फी भरावी लागते?
– कोर्ट मॅरेजसाठी वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी फी भरावी लागते. ही फी कमीत कमी 1000 रुपये असते.
मित्रांनो, Court Marriage in Marathi बद्दल वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी Krushi Yojana ला Teligram वर नक्की फॉलो करा. इंस्टाग्राम वरून फोटो डाऊनलोड करण्यासाठी आमच्या Saveinsta या वेबसाइट ला नक्की भेट द्या.