PAN Card Correction Online | How to Update PAN Card Online | Pan Card Name Change | PAN Card DOB Change | PAN Card Photo Change Online
मित्रांनो, तुमच्या पॅन कार्ड मध्ये असणारी त्रुटि म्हणजे नाव बरोबर नसणे, जन्म तारीख चुकीची असणे, फोटो नसणे इत्यादि भविष्यात समस्या निर्माण करू शकतात. PAN card मध्ये दुरूस्ती करण्यासाठी आधी ज्याच्या जवळ आपण PAN Card काढले त्याच्या जवळ जावे लागत होते. परंतु PAN Card Correction तुम्ही अगदी घरी बसून तुमच्या मोबाइल वरच करू शकता. PAN Card मध्ये Online Correction कसे करावे? या बद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.
Online PAN Card Correction/Update
PAN Card मध्ये ऑनलाइन दुरूस्ती करायची असेल तर खाली आम्ही दुरूस्ती कशी करावी या बद्दल माहिती दिली आहे:
-
- सर्वात आधी NSDL च्या अधिकृत वेबसाइट www.tin-nsdl.com वर जा.
- वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
- मुखपृष्ठावर तुम्हाला Services Section मध्ये “PAN” हा पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला Change/Correction in PAN Data वर क्लिक करावे लागेल.
- नंतर ड्रॉपडाउन मेन्यू मधून तुम्हाला Changes or Correction in existing PAN data/Reprint of PAN Card (No modifications in Existing PAN Data) हा पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडेल या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, मोबाइल क्रमांक, captcha code इत्यादि भरून सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.
- पुढील पृष्ठावर तुमच्यासमोर तुमचा PAN कार्ड चा संपूर्ण डाटा दिसेल.
- तुम्हाला ज्यात बदल करायचा आहे तो पर्याय निवडा आणि SUBMIT बटन वर क्लिक करा.
वरील प्रकारे तुम्ही PAN Card मध्ये Online Correction करू शकता.
PAN Card Correction/ Update Offline
- नवीन पॅन कार्ड किंवा/आणि अपडेट्स किंवा पॅन डेटा फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी अधिकृत वेबसाइट वरुण विनंती अर्ज डाउनलोड करा.
- अर्जा मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा..
- फॉर्म पूर्ण केल्यानंतर, तो जवळच्या NSDL संकलन केंद्रात जमा करा फॉर्म च्या सोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड ची झेरॉक्स सुद्धा जोडा.
- तुम्हाला ऑफलाइन पॅन कार्ड अपडेट/दुरुस्तीसाठी आवश्यक शुल्क भरावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 15-अंकी पोचपावती क्रमांक मिळेल जो तुम्ही तुमच्या पॅन कार्ड अर्जाची स्थिती तपासण्यासाठी वापरू शकता.
Change Name on PAN Card
पॅन कार्डवर, काही बार्याचदा नावे चुकीची लिहिली जाण्याची शक्यता असते. अनेकांना लग्नानंतर पॅनकार्डवरील नाव कसे बदलावे हे माहीत नसते. अशा परिस्थितीत त्यातील नावे अपडेट करता येतील. पूर्वी नमूद केलेली ऑनलाइन किंवा ऑफलाइन पॅन कार्ड अपडेट/दुरुस्ती प्रक्रिया वापरून, तुम्ही पॅन कार्डवरील नाव बदलू शकता. तुमच्या पॅन कार्डवर नाव बदलण्याची विनंती करताना, खालील मुद्दे लक्षात ठेवा:
Change Name in PAN Card Offline
- PAN Card Correction/Update Form काळजीपूर्वक भरावा जेणेकरून पुन्हा त्यात चूक होणार नाही.
- Offline Pan Card Update form जमा करतांना त्यासोबत ओळखीची पुरावा आणि फोटो आवश्यक असते.
पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी महत्वाची कागदपत्रे
सध्याचे पॅन तपशील अपडेट करण्यासाठी NSDL ला अर्जासोबत अनेक कागदपत्रे देणे आवश्यक आहे. अर्ज आणि सहाय्यक कागदपत्रे नंतर भारतभर पसरलेल्या जवळपासच्या पॅन कार्ड केंद्रांवर वितरित केली जातात. कागदपत्रांची यादी एखाद्या व्यक्तीची ओळख, पत्ता, जन्मतारीख आणि वर्तमान पॅनचा पुरावा म्हणून काम करू शकते.
नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न (FAq)
मी माझा पॅन नंबर ऑनलाइन बदलू शकतो का?
ऑनलाइन किंवा ऑफलाइन पॅन क्रमांक बदलणे शक्य नाही. पॅन कार्डची इतर माहिती मात्र अपडेट केली जाऊ शकते.
मी माझ्या पॅन कार्डवरील माहितीमध्ये ऑनलाइन दुरूस्ती करू शकतो का?
NSDL पोर्टल किंवा UTIITSL पोर्टलद्वारे, तुम्ही ऑनलाइन फॉर्म सबमिट करू शकता आणि पॅन कार्ड मधी माहितीमध्ये बदल करू शकता.
पॅन च्या डेटामध्ये बदल किंवा सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे?
NSDL ला.
मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर नक्की फॉलो करा.