Indira Gandhi Pension Yojana 2024 | विधवा पेंशन योजना महाराष्ट्र 2024 | वृद्धावस्था पेंशन योजना महाराष्ट्र | Indira Gandhi Old Age Scheme Maharashtra Application Form | Maharashtra Government Pension Scheme | इंदिरा गांधी निराधार योजना | इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र | 60 वर्षावरील पेन्शन योजना | वृद्ध पेन्शन योजना महाराष्ट्र
देशातील नागरिकांना पेन्शन देण्यासाठी केंद्र सरकारने इंदिरा गांधी पेंशन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, वृद्धावस्थेत चांगले जीवन जगण्यासाठी बीपीएल कुटुंबातील वृद्ध लोक, विधवा महिला, अपंग व्यक्ती (BPL family elders, widow women, disabled persons etc.) इत्यादींना सरकार कडून दर महिन्याला पेंशन दिल्या जाते. मागच्या लेखातून आम्ही तुम्हाला विधवा पेंशन योजना बद्दल माहिती सांगितली होती. या लेखाद्वारे, आम्ही तुम्हाला या Indira Gandhi Pension Yojana 2024 संबंधित संपूर्ण माहिती जसे अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता इत्यादी सांगणार आहोत, तरी विनंती आहे की आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
Indira Gandhi Pension Yojana 2024
इंदिरा गांधी पेंशन योजने मध्ये वृद्धावस्था पेंशन योजना, अपंग पेंशन योजना, विधवा पेंशन योजना इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. इंदिरा गांधी पेंशन योजना देशातील सर्व राज्यांमध्ये सुरू आहे तसेच देशातील बीपीएल कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. देशातील वृद्ध, विधवा, अपंग व्यक्ती ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना इंदिरा गांधी निराधार योजना 2024 (Indira Gandhi Pension Yojana) साठी अर्ज करावा लागेल. तरच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. अर्ज प्रक्रिया आम्ही खाली दिली आहे.
इंदिरा गांधी पेंशन योजनेचा उद्देश
आपल्याला माहिती आहेच की, देशातील वृद्ध लोक ज्यांच्या जवळ वृद्धापकाळात उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते आणि वृद्धावस्थेमुळे ते कोणतेही काम करू शकत नाहीत आणि विधवा स्त्रियांकडे सुद्धा पतीच्या निधनानंतर उत्पन्नाचे कुठलेही साधन नसते आणि त्याचप्रमाणे अपंग लोक अपंगत्वामुळे कोणतेही काम करण्यास असमर्थ आहेत. या सर्व समस्या पाहता केंद्र सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय पेंशन योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत या सर्व नागरिकांना चांगले जीवन जागता यावे यासाठी केंद्र सरकार कडून प्रती महिन्याला पेंशन स्वरुपात काही रक्कम दिल्या जाते ज्याचा उपयोग हे लोक आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकतात. Indira Gandhi National Pension Scheme 2024 अंतर्गत अपंग व्यक्ती, वृद्ध आणि विधवा महिलांना स्वावलंबी बनवणे. जेणेकरून तो कोणावरही अवलंबून नाही. हा सरकार चा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
Indira Gandhi Pension Scheme 2024
योजनेचे नाव | इंदिरा गांधी पेंशन योजना |
---|---|
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
विभाग | समाज कल्याण विभाग |
उद्देश | पेंशन द्वारे आर्थिक मदत |
लाभार्थी | देशातील सर्व वृद्ध, अपंग, विधवा महिला |
इंदिरा गांधी पेंशन योजनेचे प्रकार
इंदिरा गांधी वृद्धावस्था पेंशन योजना
केंद्र सरकारतर्फे 9 नोव्हेंबर 2007 रोजी ही योजना देशातील वृद्धांसाठी सुरू केली. या योजनेंतर्गत देशातील बीपीएल कुटुंबातील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांना पेंशन स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. या योजने अंतर्गत जे वृद्ध व्यक्ति 60 ते 79 वर्षे वयोगटातील आहेत, त्यांना सरकारकडून दरमहा 500 रुपये पेन्शनची स्वरुपात रक्कम दिल्या जाते. आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना 800 रुपयांची पेन्शन रक्कम दिल्या जाते. (Indira Gandhi Pension Yojana 2024)
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना
केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत देशातील विधवा महिलांना आर्थिक मदत पुरविल्या जाते. पतीच्या मृत्यूनंतर महिलांना जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होते. हे लक्षात घेता विधवा पेंशन योजना (Vidhwa Pension Yojana) सुरू करण्यात आली आहे. विधवा पेंशन योजनेअंतर्गत, देशातील विधवा, ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आणि 59 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना सरकारकडून आर्थिक मदत म्हणून दरमहा 300 रुपये पेन्शन रक्कम दिल्या जाते, ज्याद्वारे विधवा महिलांना जीवन जगताना आर्थिक मदत होते. बीपीएल कुटुंबातील विधवा महिला या योजने साठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
इंदिरा गांधी अपंग पेंशन योजना
ही योजना अपंग व्यक्तीसाठी केंद्र सरकार कडून सुरू करण्यात आली आहे, ज्या अपंग व्यक्तीचे वय हे 18 ते 80 या मध्ये आहे आणि बीपीएल कुटुंबातील आहेत असे लोक या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतात. तुम्हाला माहिती आहेच की, अपंगत्वामुळे अनेकांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. ज्यामुळे त्यांना जीवन जगताना खूप अडचणीचा सामना करावा लागतो, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्तीवेतन (Indira Gandhi Pension Yojana 2024) योजनेंतर्गत देशातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतनाची रक्कम सरकार कडून दिल्या जाते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय पेंशन योजना 2024 साठी पात्रता
- या योजने अंतर्गत येणार्या वृद्धावस्था पेंशन योजनेचे वय हे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- विधवा पेंशन योजनेसाठी विधवा महिलांचे वय हे कमीत कमी 40 वर्ष असावे तसेच 59 वर्षापेक्षा जास्त असू नये.
- Indira Gandhi Pension Yojana 2024 साठी अर्जदार हा कमीत कमी 80 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त विकलांग असावा. अन्यथा लाभ मिळणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बीपीएल रेशन कार्ड
- वय प्रमाणपत्र
- पत्ता
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- मोबाइल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
इंदिरा गांधी पेंशन योजना अर्ज प्रक्रिया
ज्यांना इंदिरा गांधी पेंशन योजना 2024 साठी अर्ज करायचा असेल त्यांना संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल कारण Indira Gandhi Pension Yojana 2024 साठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन नसून ऑफलाइन आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती ही संबंधित कार्यालयाशी संपर्क साधूनच मिळेल.