EWS certificate Maharashtra online apply | EWS certificate Maharashtra documents required | mahaonline ews certificate | EWS Certificate Maharashtra 2024 | How to get EWS Certificate in Maharashtra
महाराष्ट्र सरकारने राज्यात सुवर्ण आरक्षण प्रणाली (Golden Reservation System) लागू केली आहे, ज्याचा लाभ महाराष्ट्र राज्यातील जनतेला होणार आहे. General Category मधील आर्थिकदृष्ट्या (EWS) वंचित व्यक्तींसाठी 10% आरक्षण प्रदान करण्याचा या निर्णयाचा उद्देश आहे. या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) भेडसावणाऱ्या समस्यांना आळा बसणार आहे. हे आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विस्तारित करून, राज्य सरकार गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना सशक्त आणि समर्थन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे.
या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला EWS Certificate Maharashtra काय आहे आणि त्यासाठी Online Application, तसेच EWS Certificate Required Documents Maharashtra, Eligibility इत्यादि बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत, विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यन्त नक्की वाचावी.
EWS Certificate Maharashtra 2024
केंद्र सरकारने “Economically Weaker Section” विधेयक यशस्वीरित्या मंजूर केले आहे, ज्याचा उद्देश देशभरातील सामान्य जातीतील आर्थिकदृष्ट्या वंचित व्यक्तींना आरक्षणाची संधी देणे हा आहे. या कायद्याला 12 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि देशभरात त्याची अंमलबजावणी करण्यात आली. EWS Certificate Maharashtra हे Income Certificate म्हणून देखील ओळखल्या जाते.
EWS हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांचे संक्षिप्त रूप आहे. EWS सुनिश्चित करते की या वर्गात येणाऱ्या व्यक्ती, ज्यांना अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षण प्रणालीचा लाभ मिळत नाही, त्यांना EWS अंतर्गत लाभ मिळेल. सर्व सरकारी पदे आणि सेवा, तसेच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांसाठी थेट भरतीमध्ये 10% आरक्षण EWS Reservation अंतर्गत दिल्या जाते. EWS Certificate Maharashtra हे Maharashtra Revenue Department कडून जारी केल्या जाते.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कोणतीही व्यक्ती ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळवू शकते. विशेषत:, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे सर्वसाधारण श्रेणीतील उपसमूह, ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे आणि जे SC, ST किंवा OBC या पैकी कोणत्याही श्रेणी मध्ये येत नाहीत.
EWS प्रमाणपत्र 2024 महाराष्ट्र
📌 नाव | EWS Certificate 2024 |
📌 कोण जाहीर करते | महसून विभाग महाराष्ट्र |
📌 लाभार्थी | महाराष्ट्रातील नागरिक ज्यांना कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळत नाही |
📌 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
📌 उद्देश | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना 10% आरक्षण प्रदान करणे |
EWS Certificate 2024 Maharashtra चा उद्देश
EWS Certificate 2024 महाराष्ट्राची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:-
- लाभार्थ्याला EWS Certificate प्रदान करून सरकारी नोकरी तसेच शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळवा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- देशातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल आणि देशातील सर्वसामान्य वर्गातील गरीब कुटुंबांचे जीवनमान सुधारेल.
- आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना EWS प्रमाणपत्र अंतर्गत सरकारी सुविधांचा लाभ घेता येईल.
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र 2024 चे फायदे
- 10% आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी General Category मधील लोक EWS Certificate Maharashtra चा वापर करू शकतात. त्यासाठी वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापेक्षा कमी असावे.
- याद्वारे राज्य सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना लाभ मिळणार आहे.
- SC, ST आणि OBC च्या आरक्षणाच्या योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या EWS मधील व्यक्तींना सरकारमधील नागरी पदे आणि सेवांमध्ये थेट भरतीमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये 10% आरक्षण मिळेल.
- गरीब लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.
Required Documents for EWS Certificate Maharashtra
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- प्रतिज्ञापत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शाळा सोडल्याचा दाखला ज्यावर General Category अशी नोंद असावी
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
- अर्जदार हा सर्वसाधारण श्रेणी मध्ये येणारा असावा. SC, ST किंवा OBC प्रवर्गातील उमदेवरांना EWS Certificate 2024 चा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदारच्या संपूर्ण परिवाराचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापेक्षा कमी असावे.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाकडे 1000 चौरस फुटांपेक्षा जास्त राहण्याची जागा नसावी.
- अर्जदारकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन नसावी.
- कुटुंबाकडे शहरी भागात 100 चौरस यार्डपेक्षा जास्त आणि ग्रामीण भागात 1000 चौरस यार्डांपेक्षा जास्त निवासी निवासी जागा नसावी.
EWS Certificate Validity
EWS Certificate Maharashtra 2024 ची मर्यादा ही जारी केलेल्या दिवसापासून 1 वर्षाची असते. 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला तुमचे EWS प्रमाणपत्र Renew करावे लागेल.
EWS Certificate Application Form
EWS प्रमाणपत्राद्वारे सामान्य प्रवर्गातील (General Category) लोकांना सरकारी योजना, सरकारी सेवा, शिष्यवृत्ती, इतर सेवा योजनांमध्ये आरक्षण दिले जाते. इच्छुक अर्जदारांनी महाराष्ट्र EWS प्रमाणपत्र 2024 काढण्यासाठी खालील चरणांचे पालन करणे आवश्यक आहे:-
- प्रथम अर्जदारांनी EWS Certificate Form PDF Download करणे आवश्यक आहे. फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता किंवा जवळच्या तहसीलदार कार्यालयाला भेट देऊ शकता आणि Maharashtra EWS Certificate साठी लागणारा अर्ज मिळवू शकता.
Click Here to Downloload EWS Certificate Pdf Form
- फॉर्म डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली माहिती स्पष्टपणे भरावी लागेल आणि नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- कागदपत्र जोडल्यानंतर, तुम्हाला ते तुमच्या प्रादेशिक महसूल विभागाच्या कार्यालयात किंवा तहसीलमध्ये जमा करावे लागेल.
- यानंतर तुमचा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासला जाईल त्यानंतर तुमचे EWS Certificate जारी केले जाईल.
वरील प्रकारे तुम्हाला EWS Certificate Maharashtra 2024 साठी अर्ज करता येईल.
नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न (Faqs)
1) EWS अंतर्गत किती आरक्षण दिल्या जाते?
– EWS अंतर्गत 10% आरक्षण दिल्या जाते
2) EWS Certificate साठी कोण अर्ज करू शकतो?
– ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदार हा सामान्य प्रवर्गातील असावा आणि त्याचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
3) EWS प्रमाणपत्र मिळवण्यसाठी अर्ज कसा करायचा?
– EWS प्रमानपत्रासाठी तुम्हाला तुमच्या महसून/तहसील कार्यालयात अर्ज करावा लागेल.
4) EWS Certificate Maharashtra चा फायदा काय आहे?
– ह्या प्रमाणपत्रावर तुम्हाला सर्व सरकारी सुविधा आणि नोकर्यांचा लाभ घेता येईल.